मुंबई : आपले भारतभरातील सेवा नेटवर्क अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने ट्रॅव्हकार्ट या हॉलिडेज बाय साहिबजी प्रायव्हेट लिमिटेड या फिक्स्ड डिपार्चर पॅकेजमधील तज्ज्ञ कंपनीकडून चालवल्या जाणाऱ्या सर्वांगीण ट्रॅव्हल सर्व्हिस पोर्टलने अलीकडेच मुंबईत आपल्या पहिल्या फ्रँचायझीसाठी करार केले आहेत. ट्रॅव्हकार्टचा भारताच्या आर्थिक राजधानीतील प्रवेश हा एका एकात्मिक वैविध्यपूर्ण चॅनल अप्रोचच्या माध्यमातून जास्तीत जास्त ग्राहकांना नावीन्यपूर्ण पर्यटन उपाययोजना देण्याच्या कंपनीच्या वचनबद्धतेचे प्रतिक आहे.
मुंबईमध्ये पर्यटन आणि संबंधित उत्पादनांसाठीच्या सर्वांत मोठी बाजारपेठ म्हणून असलेल्या प्रचंड क्षमतांचा उपयोग करण्यासाठी हे धोरणात्मक पाऊल ट्रॅव्हकार्टसाठी महत्त्वाचे आहे. ट्रॅव्हकार्टच्या मुंबईतील फ्रँचायझी धोरणाची सुरुवात अत्यंत अनोखी आहे. कारण ते भागीदार पर्यटन एजन्सींना एंड टू एंड बिझनेस सपोर्ट देतात. त्यांच्या फ्रँचायझी प्रोग्रामचा भाग म्हणून ही कंपनी संबंधित ट्रॅव्हल एजन्सीला अधिक चांगल्या ग्राहक सेवा देण्यासाठी आणि अधिक चांगली व्यवसाय वाढ देण्यासाठी व्यापक सहकार्य करेल.
ट्रॅव्हकार्टचे सहसंस्थापक मानहीर सिंग सेठी म्हणाले की, भारताचे व्यवसाय केंद्र आणि सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर यामुळे मुंबई हे देशातील सर्वाधिक मोठ्या पर्यटन बाजारपेठांपैकी एक आहे. शहरामध्ये पर्यटन पॅकेजेससाठी मोठी आणि वाढती मागणी आहे आणि त्याचमुळे इथल्या पहिल्या फ्रँचायझीबद्दल आम्हाला खूप आनंद होत आहे. आमच्याकडे यासाठी मोठ्या प्रमाणावर विनंत्या आल्या. मात्र, आम्ही कांगारू ट्रॅव्हल्ससोबत आमचा फ्रँचायझी करारनामा पूर्ण केला असून त्याचे कारण म्हणजे ब्रँडची दीर्घकालीन वाढ आणि ग्राहकांच्या समाधानाप्रति त्यांची असलेली वचनबद्धता होय. आमचे ध्येय हे भारतातील सर्व मोठ्या शहरांमध्ये आमचे अस्तित्व वाढवण्याचे आणि २०२० पर्यंत १०० ट्रॅव्हकार्ट फ्रँचायझी उभारण्याचे आहे.