अस्थिचे विसर्जन न करता शेतात टाकुन केली वृक्षलागवड
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वरणगांवातील महाले परिवाराचा उपक्रम
विजय वाघ। प्रतिनिधी
वडीलांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या अस्थि नदीपात्रात विसर्जीत न करता अस्थि व अंत्यसंस्काराची राख शेतात टाकुन त्या ठिकाणी फळांच्या वृक्षाची लागवड करण्यात आली. यामुळे वरणगांवातील महाले परिवाराने पर्यावरण समतोलाचा एक प्रकारे संदेश इतर नागरीकांना देवून पर्यावरणाचा समतोल राखण्याचे आवाहन केले आहे.
वरणगांवातील पत्रकार सुरेश महाले ( मुळ रा. निंभोरा ता. रावेर ) यांचे वडील देवराम केशव महाले (वय -८३ )आयुध निर्माणीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी परिवारासह शहरातील सम्राट नगर मध्ये वास्तव्य सुरु केले. मात्र, त्यांचे दि .१० जून रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी, तिन मुले, एक मुलगी व सुना, नातवंडे असा परिवार त्यांचे मोठे चिरंजीव बी . डी . महाले फैजपुर येथील नगर परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असून द्वितीय सुरेश महाले वरणगांवला फोटोग्राफी व दै . पुण्यनगरीमध्ये पत्रकारीता करतात तर तृतीय चिरंजीव सुनिल महाले हे सौरउर्जा प्रकल्प वढवे येथे सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत असून इतर नातेवाईकही शासकीय उच्चस्थ पदावर कार्यरत आहेत.अशा या सर्व सुशिक्षीत व सुस्कृंत परिवारातील तिन्ही भावांनी वडीलांच्या निधनानंतर पर्यावरणाच्या समतोलाचे भान ठेवून अंत्यसंस्कारातील अस्थि व राखेचे नदीपात्रात विसर्जन न करता आपल्या मुळगांवी निंभोरा येथील शेतात टाकली तर काही राख व अस्थि खड्यांमध्ये टाकून त्यामध्ये फळ झाडे लावली. व या वृक्ष रोपांचे काळजीपूर्वक संगोपन करण्याचा केल्याने त्यांच्या या कृतीने त्यांनी एक प्रकारे पर्यावरण समतोल राखण्याचा मानवाला संदेश दिला आहे .
???????? दरवर्षी करणार वृक्षारोपण
महाले परिवाराने वृक्षरोपन करून मानवाला पर्यावरण समतोल राखण्याचा संदेश दिला आहे . इतकेच नव्हेतर वडीलांच्या प्रत्येक पुण्यस्मरण दिनाला किमान एक वृक्ष लागवडीचा पत्रकार सुरेश महाले व परिवाराने संकल्प केला आहे . या उपक्रमामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक तसेच त्यांच्या वडीलांच्या निधनामुळे त्यांचे सात्वंन हि केले जात आहे .