नवी दिल्ली: तृणमूल कॉंग्रेसच्या खासदारांनी राज्यसभेतील नियम २६७ अन्वये मोदी सरकारला नोटीस दिली आहे. अलीकडील अल्पसंख्याक समाजावर वाढलेल्या अत्याचाराविषयी लोकसभा, राज्यसभेत सोमवारी याविषयी चर्चा करण्यास सांगितले आहे.
देशात सध्या अल्पसंख्याक समाजाला लक्ष केले जात असून केंद्रसरकारला या प्रश्नावरून विरोधकांनी घेरले आहे. कॉंग्रेस पाठोपाठ आता तृणमूलच्या खासदारांनी या विषयी मोदी सरकारला जाब विचारला आहे. गेल्या आठवड्यात असुद्दिन ओवेसी यांनी गृहमंत्री अमित शहा यांना मॉब लिंचीगच्या घटनांविषयी कडक कायदा करण्याची मागणी केली होती.