नवी दिल्ली: प्रचारदौरा आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केदारनाथ, बद्रीनाथच्या दोन दिवसीय दौऱ्यावर गेले आहे. काल त्यांनी केदारनाथ येथे पूजापाठ करून ध्यानधारणा केली होती. आज ते बद्रीनाथला जाणार आहे. त्यांच्या या दौऱ्यावर तृणमूल कॉंग्रेस या पक्षाने आक्षेप घेतला असून हा आचारसंहितेचे उल्लंघन करणारा दौरा आहे असे त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे.
या लिहिलेल्या पत्रामध्ये तृणमूल कॉंग्रेसने लिहिले आहे कि निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान संपले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्याला माध्यमांकडून मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळत असल्याची टीका त्यांनी याद्वारे केली आहे, यावर निवडणूक आयोग काय दखल घेते? हे पाहणे औस्तुक्याचे ठरेल.