त्रिपुरा- त्रिपुऱ्याचे मुख्यमंत्री विप्लब देव जेंव्हा पासून मुख्यमंत्री पदी विराजमान झाले आहे. तेंव्हा पासून ते रोज नवनवीन वक्तव्याने अडचणीत येत आहे. वारंवार ते आक्षेपार्ह विधान करीत आहे. दरम्यान त्यांनी अजब वक्तव्य केले आहे. नोकरी करण्यापेक्षा जर प्रत्येकानी गाय पाळली असती तर प्रत्येकांकडे १० वर्षात १० लाख ठेवी बँकेत असती. नोकरी मागे धावण्यापेक्षा गाय पाळल्यास नोकरी मागण्याची वेळ आली नसती असे वक्तव्य त्यांनी केले आहे. निवडणूक काळात नोकरी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आता असे वक्तव्य करीत असल्याने त्यांच्यावर टीका होत आहे. यागागोदर त्यांनी इंटरनेटचा वापर महाभारत काळापासून होत असल्याचे सांगत अजब गजब शोध लावला. त्यानंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय सोंदर्य स्पर्धेस तमाशा संबोधले होते. डायना हेडन यांच्या मिस वर्ल्ड होण्यावरही त्यांनी शंका उपस्थित केली होती.