हैदराबाद- तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून तेलंगाना राष्ट्र समिती (टीआरएस) प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी काल दुसऱ्यांदा शपथ घेतली. त्यामुळे त्यांनी पक्षाध्यक्ष पदाची जबाबदारी त्याचे पुत्र के.टी.रामा राव यांना कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे. टीआरएसमध्ये आणि केसीआर सरकारमध्ये के.टी.रामा राव यांना दोन नंबरचे स्थान आहे.
के.टी.रामा राव मागील सरकारमध्ये उद्योगमंत्री होते. या सरकारमध्ये देखील पुढील आठवड्यात ते मंत्रिमंडळात येऊ शकतात.