राफेल करार: अखेर ‘सत्याचा विजय’ झाला-भाजप

0

नवी दिल्ली-राफेल करारात कोणतेही आक्षेपार्ह मुद्दे नाही असे सांगत सुप्रीम कोर्टाने राफेल कराराच्या चौकशीची याचिका फेटाळून लावली. कोर्टाच्या या निर्णयामुळे भाजपला तसेच मोदी सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. राफेलच्या मुद्द्यावरून कॉंग्रेस विशेषत: राहुल गांधी मोदी सरकारवर वारंवार टीका करत होते. मात्र कोर्टाच्या निर्णयामुळे राफेल घोटाळा नसल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान भाजपने कोर्टाच्या या निर्णयाचा स्वागत करत अखेर सत्याचा विजय झाला आहे असे सांगितले आहे.

भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी ट्वीट करत सत्य नेहमीच विजयी होते! राजकीय फायद्यासाठी काँग्रेस अध्यक्षांनी चुकी प्रचार केला असे अमित शहा यांनी सांगितले आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी देखील ‘सत्यमेव जयते’ असे ट्वीट केले आहे.

भाजपने त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरून सुप्रीम कोर्टाचे निर्णयदेखील राहुल गांधी मान्य करणार नाही असे सांगत खिल्ली उडविली आहे. ‘राहुल बाबा नही मानेगे’ असे ट्वीट केले आहे.