प्रवासी महिलेची पर्स परत करुन रिक्षाचालकाने घडविले प्रामाणिकपणाचे दर्शन

0

जळगाव : शहरात एकीकडे चोरीच्या घटनांनी वातावरण ढवळून निघाले असताना दुसरीकडे आपल्या रिक्षात प्रवासी महिलेची आठ हजाराचा मोबाईल व चार हजार रुपये रोख व कागदपत्रे असा एैवज परत करुन रिक्षाचालकाने प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले आहे. जिल्हापेठ पोलीस निरिक्षकांनी हाजी युनुसखान जमसेदखान (रा. पोलीस लाईन) रिक्षाचालकाचे कौतुक केले आहे.

लग्नसोहळयासाठी शुभांगी अमोल दिंडोरकर (30) ह्या चिंचवड पुणे येथून शुक्रवारी जळगावला आल्या. पंचमुखी हनुमान परिसरात लग्न आटोपल्यानंतर त्या खोटेनगर परिसरात जाण्यासाठी हाजी युनुसखान जमशेदखान (रा. पोलीस लाईन) यांच्या रिक्षा क्रमांक एम.एच. 19 व्ही. 3588 मध्ये बसल्या. त्यांनी पर्स सिटच्या मागच्या बाजूला ठेवली होती. इच्छितस्थळी भाडे देऊन त्यारिक्षातून उतरून गेल्या. दरम्यान प्रवाशी महिलेची पर्स रिक्षात राहून गेल्यो हाजी युनुसखान यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी जिल्हापेठ पोलीस स्टेशन गाठुन पोलीस निरीक्षक विलास सोनवणे यांच्या स्वाधीन केली. या बॅगमध्ये 04 हजार 500 रूपये रोख, आठ हजार रूपये किंमतीचा मोबाईल, एक चांदीचे कडे तसेच एटीएम कार्ड आढळून आले. जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संदीप आराक यांनी पर्समधी मोबाईलवरुन महिलेशी संपर्क केला. व त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून रिक्षाचालक हाजी युनूसखान जमशेद यांच्या उपस्थितीत शुभांगी दिंडोरकर यांच्या स्वाधीन केली. चालक हाजी युनुसखान यांच्या प्रामाणिकपणाबददल पोलिस निरीक्षक सोनवणे यांच्यासह पोलीस कर्मचार्‍यांनी कौतुक केले.