मंत्रालयासमोर 27 वर्षीय महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

0
तक्रार करूनही पोलिसांनी दखल न घेतल्याने उचलले पाऊल
मुंबई-एका 27 वर्षीय माहिलेने गुरुवारी दुपारच्या सुमारास मंत्रालयाच्या मुख्य गेटच्या समोर रॉकेल ओतून पेटवून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. गर्दीच्या वेळी झालेल्या या प्रकाराने एकच गोंधळ झाला. पोलिसांनी वेळीच धावाधाव केल्याने पुढील अनर्थ टळला. दीपाली खंडू भोसले असे या विवाहित महिलेचे नाव आहे. त्रास देत असलेल्या एका व्यक्तीच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करूनही त्यावर पोलिसांकडून कोणतीच कारवाई करण्यात येत नाही. त्यामुळे मंत्रालयात दाद मागण्यासाठी दीपाली यांनी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला.
चेंबूर येथील आरसीएफ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका भागात दिपाली भोसले या रहात आहेत. माहितीनुसार त्यांचे लग्न होवूनही मागील सात वर्षापासून त्यांचे पती त्यांच्या सोबत न राहता अन्य एका महिलेसोबत राहत आहेत. या ठिकानी सय्यद मोहम्मद अन्सारी आणि अन्य दोन व्यक्ती तिला त्रास देत होत्या. त्यांच्या विरोधात आरसीएफ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. परंतु पोलिसांकडून कोणतीच कारवाई करण्यात येत नव्हती. त्याविरोधात मंत्रालयातील गृह विभागात दाद मागण्यासाठी सदर महिला दिपाली भोसले या मंत्रालयात आल्या होत्या. मात्र तिला मंत्रालयात न सोडल्याने तीने मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच अंगावर रॉकेल ओतून घेवून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती मंत्रालयातील पोलिसांनी दिली. दरम्यान, सदर महिलेची समजूत काढण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. परंतु तिला अचानक घेरी येवून खाली कोसळल्याने तीला पोलिसांनी तातडीने जी.टी.हॉस्पीटल येथे पुढील उपचारासाठी नेण्यात आले.