नवी दिल्ली- हिंसा भडकवणे, महिलांविरोधातील संदेश किंवा अफवा पसरवण्याला खतपाणी घालणाऱ्या आक्षेपार्ह आणि अवैध मजकूर हटवण्याच्या दिशेने संथगतीने काम सुरु असल्याच्या कारणावरुन सरकारने ट्विटरला धारेवर धरले आहे. ट्वीटरने दिशा-निर्देशांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल, असा इशाराही सरकारने दिला आहे.
केंद्रीय गृह सचिव राजीव गोबा यांनी ट्विटर इंडियाचे कायदा आणि सुरक्षा प्रमुख विजय गाडे आणि महिमा कौल यांना सरकारी संस्थांच्या आदेशांचे त्वरीत निराकरण करण्यासाठी २४ तास काम करणारी यंत्रणा निश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत.
गृह मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने आक्षेपार्ह मजकुरांविरोधात प्रभावी कारवाईसाठी आयोजित बैठकीत मायक्रोब्लॉगिंग साइटच्या अधिकाऱ्याने काही प्रकरणात ट्विटर आक्षेपार्ह माहिती हटवणे किंवा ब्लॉक करण्याचे काम मंदगतीने करत असल्याचे सांगितले. बनावट बातम्यांवर अंकुश लावण्यासाठी आपण प्रतिबद्ध असल्याचे, भारताच्या दौऱ्यावर पहिल्यांदाच आलेले ट्विटरचे सीईओ जॅक डोरेसी यांनी म्हटले.