नवी दिल्ली: काश्मीरमधील परिस्थितीबद्दल अफवा पसरविणारे ट्विट करणाऱ्या पाकिस्तानचे राष्ट्रपती आरीफ अल्वी यांना ट्विटरने नोटीस पाठली आहे. मानवाधिकार मंत्री शेरीन माझरी यांनी राष्ट्रपतींना आलेल्या नोटीसचा स्क्रीनशॉर्ट ट्विटवरुन शेअर केला आहे. राष्ट्रपतींच्या अकाऊंटवरुन श्रीनगरमधील परिस्थितीबद्दल खोटी माहिती देण्यात आल्याचे ट्विटरने या नोटिसीमध्ये नमूद केले आहे.
काल सोमवारी राष्ट्रपती अल्वी यांनी कलम ३७० रद्द केल्यानंतर काश्मीरमध्ये सुरु असणाऱ्या आंदोलनांचा व्हिडिओ असे म्हणत एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओला त्यांनी “ही श्रीनगरमधील दृष्ये आहेत. संचारबंदी, गोळीबार करुन येथील स्थानिकांवर अत्याचार केले जात आहेत. काश्मीरींचा भारताविरुद्ध असणारा असंतोष दाबून टाकला जात आहे. त्यांना कोणतीही किंमत मोजावी लागली तरी भारतापासून स्वातंत्र्य हवे आहे. प्लिज हे रिट्विट करुन जगापर्यंत पोहचवा” अशी कॅप्शन दिली होती. याआधी रविवारी पाकिस्तानचे दूरसंचार मंत्री मुराद साहीद यांनाही आपल्याला ट्विटकडून नोटीस आल्याचे सांगितले होते. माझे एक ट्विट भारतीय कायद्यांचे उल्लंघन कऱणारे आहे असे ट्विटरचे म्हणणे आहे.