पाकिस्तानच्या गोळीबारात दोन जवान शहीद

0

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सीमेवर पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. जम्मू-काश्मिरच्या अखनूर सेक्टरजवळील रात्री जवळपास २ वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानच्या रेंजर्सनी केलेल्या गोळीबारात दोन भारतीय सीमा सुरक्षा दलाचे जवान शहीद झाले आहेत. यावेळी दोन्ही बाजूंनी अजूनही गोळीबार सुरु होते. अंदाधुंद गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याला बीएसएफचे जवान सडेतोड प्रत्युत्तर देत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्याने शनिवारी रात्री उशिरा अखनूर सेक्टरमधील लष्कराच्या चौक्यांवर जोरदार गोळीबार करण्यात आली. या गोळीबारात बीएसएफचे दोन जवान गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.दरम्यान, नियंत्रण रेषेजवळ असलेल्या गावांमध्येही मोठे नुकसान झाले असून, या गोळीबारात तीन नागरिक जखमी झाले आहेत.