लोणावळ्यात खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू

0

पुणे-लोणावळ्यात दोन मुलांचा खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेले असता या मुलांचा बुडून मृत्यू झाला. सकाळी साडे आठ वाजता ही दुर्देवी घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, प्रस्तावित कचरा डेपोसाठी बांधकाम सुरू होते. त्यासाठी एक खड्डा खोदण्यात आला होता. खड्ड्यात पावसाचे पाणी साचले होते. याच पाण्यात ही दोन मुलं पोहण्यासाठी गेली होती. यावेळी दोघांचाही बुडून मृत्यू झाला आहे.