काश्मिरात पुन्हा दहशतवादी हल्ला; दोन जवान शहीद

0

पंपोरे: काश्मीर खोऱ्यात पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला आहे. दक्षिण काश्मीरमधील पंपोर येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात सीआरपीएफचे दोन जवान शहीद झाले आहेत. तर तीन जवान जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पंपोर बायपास येथे गस्तीवर असणाऱ्या सीआरपीएफच्या रोड ओपनिंग पार्टीच्या (आरओपी) पथकावर काही दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरु केला. यामध्ये पाच जवान जखमी झाले होते, त्यांना उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान, उपचार सुरु असताना दोन जवानांचा मृत्यू झाला. दहशतवादी हल्ल्यानंतर येथील महामार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे.