सावदा (प्रतिनिधी) – सावदा नगर पालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाचे झालेली बैठकीत यावर्षी हावमान ख्यात्याचे अंदाजा नुसार मे महिन्यात मोठ्या प्रमाणत उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता बघता यामुळे पणावठया वरील पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होऊ शकते तसेच जून महिन्यात देखील कमी पावसाची शक्यता विचारात घेता या बैठकीत पाण्याचे योग्य नियोजन करावे अश्या सूचना देण्यात आल्या नंतर सावदा पालिकेने दि 8 सोमावर पासून शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे
दरम्यान सावदा शहरात मोठ्या संख्येने मजूर, शेत मजूर असून या लोकांना दोनदिवसाआड पाणीपुरवठा केल्यास त्यांचा रोजगार बुडवून त्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागेल तसेच सध्या लग्नसराई लक्षात घेता येणार पाहुणे मंडळी बघता नागरिकांना एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी साढवणे शक्य नाही यामुळे मजूर तसेच नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होऊ शकता हे सर्व लक्षात घेता येथील माजी नगरसेवक राजेंद्र चौधरी व फिरोज खान पठाण यांनी सदर बातमी माध्यमातून समजली असून सदर प्रमाणे नागरिकांचे हाल होऊ नये म्हणून तसेच धरणातील पाणी साठाचे बाष्पीभवन होईल असे सांगितले आहे तथापी आपण ऑक्टोंबर पर्यंत जरी नेहमी प्रमाणे पाणी साठा उचलला तरी धरणातील पाणी 10% देखील साठा पाणी कमी होणार नाही म्हणून सदर निर्णयाचा फेर विचार करून पुन्हा पूर्ववत एक दिवसआड पाणी पुरवठा करावा अन्यथा आम्हास शांततेने किंवा अन्यमार्गाने यासाठी प्रयत्न करावे लागतील व होणाऱ्या परिणामास नगर पालिका जबाबदार असेल असे निवेदन नगर पालिकेत दिले असून या निवेदनाचा विचार करून शहरातील पाणी पुरवठा पुन्हा पुर्ववत करावा अशी अपेक्षा शहरवासीय नागरिक देखील करीत आहे