कांचनगंगा शिखर सर करताना दोन भारतीयांचा मृत्यू !

0

भूतान: कांचनगंगा हे नेपाळमधले सर्वोच्च शिखर आहे. या शिखरावर पोहचताना दोन भारतीय गिर्यारोहकांचा मृत्यू झाला. बिप्लब बैद्य (४८) आणि कुंतल कनरार (४६) अशी या दोघांची नावे आहेत. बिप्लब बैद्य गिर्यारोहण करताना आजारी पडले होते. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. तर कुंतल करनार शिखरावर चढताना कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. बैद्य हे ८ हजार ५८६ मीटर्स अंतरापर्यंत चढाई करून गेले होते. बिप्लब बैद्य हे आजारी झाले होते, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असं समजतं आहे. एएनआय आणि रॉयटर्स या दोन वृत्तसंस्थांनी या संदर्भातले वृत्त दिले आहे. कांचनगंगा हे नेपाळमधले सर्वोच्च शिखर आहे.