हा आमदार सकाळी भाजपकडे तर संध्याकाळी कॉंग्रेसकडे

0

बंगळूर-कर्नाटकात बी.एस.येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असली तरी त्यांना १५ दिवसात बहुमत सिद्ध करुन दाखवावे लागणार आहे. त्यामुळे बहुमताची जुळवा-जुळव करण्यासाठी कर्नाटकात घोडेबाजार जोरात सुरु आहे. या राजकीय नाटयामध्ये अपक्ष आमदारांची भूमिका महत्वाची असून त्यांना आपल्या बाजूला खेचण्यासाठी दोन्ही बाजूंकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत.

कर्नाटकात मुलबागल विधानसभा मतदारसंघातून एच.नागेश हे ऐकमेव अपक्ष आमदार निवडून आले आहेत. उत्तर कर्नाटकातील रानीबीन्नूर विधानसभा मतदारसंघातून केपीजेपीचे आर.शंकर एकमेव उमेदवार विजयी झाले आहेत. या दोघांना आपल्या बाजूला वळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. काल रात्री उशिरा काँग्रेसकडून दोन्ही आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा करण्यात आला होता.

केपीजेपीचे आमदार आर.शंकर काँग्रेससोबत असल्याचे सांगण्यात येत होते. पण बुधवारी सकाळी आर.शंकर यांनी भाजपा नेते ईश्वराप्पा यांच्यासोबत येडियुरप्पांच्या निवासस्थानी गेले होते. त्यानंतर बुधवारी संध्याकाळी शंकर काँग्रेस कार्यालयात पोहोचले व भाजपाची साथ सोडल्याचे जाहीर केले. आपण भाजपा सोबत जाणार नाही आपली निष्ठा काँग्रेससोबत कायम आहे असे शंकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. आमदार जेएन गणेश यांच्यावर शंकर यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.