ग्यारापत्ती: पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले. गडचिरोलीतील ग्यारापत्ती गावात ही चकमक झाली. सी-६० चे जवान नक्षलविरोधी अभियान राबवत होते. नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन नक्षलींचा खात्मा झाला.
नरकसा जंगल परिसरात पोलीस आणि नक्षलींमध्ये चकमक उडाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. यावेळी सी-६० चे जवान नक्षलविरोधी अभियान राबवत होते. नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन नक्षलींचा खात्मा झाला. त्यांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.