उन्नाव बलात्कार प्रकरणी दोन पोलीस अधिकाऱ्यांना अटक 

0
उन्नाव – उन्नाव बलात्कार पीडितेच्या वडिलांच्या मृत्यूप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने बुधवारी उत्तर प्रदेशच्या २ उपनिरीक्षकांना अटक केली आहे. भाजपचे आमदार कुलदीप सिंग सेंगर यांच्यावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. उन्नाव जिल्ह्यातील माखी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अशोक सिंग भदौरीया आणि कामता प्रसाद सिंग यांना गुन्हेगारी कट रचणे आणि पुरावे नष्ट करणे या आरोपांखाली अटक करण्यात आली आहे. सध्या दोघांनाही निलंबित केले आहे. पीडितेने ४ जून २०१७ रोजी आमदार कुलदीप सिंग सेंगर यांनी तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला. पीडित मुलीच्या वडिलांवर ३ एप्रिल रोजी शस्त्रास्त्र कायद्याखाली गुन्हा दाखल केला होता आणि ५ एप्रिलला त्यांना तुरुंगात ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला होता.