मुक्ताईनगर प्रतिनिधी…..
सीईटी चा क्लास न लावता रावेर शहरातील दोन विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे
रावेर शहरातील गरीब कुटुंबातील दोन विद्यार्थ्यांनी कु पलक सचिन डेरेकर 94.32% व चि कलश सचिन डेरेकर 88.46% अशा दोन्ही भाऊ-बहिणीने सीईटी परीक्षेमध्ये यश संपादन केले असून त्यांना शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन व आई-वडील व मामा मामी यांचे मार्गदर्शन लाभले असून दोन्ही बहीण भावंडावरती रावेर शहरातून व नातेवाईकांडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे