कुलगाममध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

0

कुलगाम: जम्मू- काश्मीरमधील कुलगाम येथे आज बुधवारी सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली असून या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. कुलगाममधील गोपालपुरा येथे सुरक्षा दलांच्या सर्च ऑपरेशन दरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. घटनास्थळी अजूनही शोधमोहीम राबवली जात आहे. चकमकीच्या पार्श्वभूमीवर परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

दरम्यान, चार दिवसांपूर्वीही अवंतीपोरा येथील पंझगाम येथे चकमक झाली होती. या चकमकीत एकूण तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. तिन्ही दहशतवादी हे हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचे होते.