जम्मू काश्मीर: येथील शोपियात भारतीय सुरक्ष रक्षक दलाला यश मिळाले असून या भागात सुरक्षा दलाची स्घोध मोहीम सुरु आहे. दक्षिण काश्मीरच्या दरमदोरा परिसरात आज सकाळपासून चकमक सुरू असून यामध्ये दोन दहशतवादी ठार झाले आहेत. काश्मीर मध्ये शुक्रवार पासून भारतिय सुरक्षा रक्षक आणि दहशतवादी यांच्यात चकमक होत आहे. शनिवारी झालेल्या चकमकीत बारामुला जिल्ह्यात जैश ए मोहम्मद या आंतकवादी संघटनेचा दहशतवादी ठार झाला होता. परत आज दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश मिळाले आहे.
आज सकाळी शोपियानमध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली असता, सुरक्षा रक्षकाच्या दलाने शोध मोहीम सुरु केली असता सुरक्षा दलावर गोळीबार सुरु केलां. त्याला प्रत्युत्तर दाखल केलेल्या गोळीबारात 2 दहशतवादी ठार झाले आहे.