जळगाव l मात्र, गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा परिषदेने विशेष दत्तक योजना राबविण्यात आली आहे. त्यामुळे आता १ हजार ८१७ तीव्र कुपोषित बालक तर ७ हजार २३८ मध्यम कुपोषित बालके आढळली आहे. दत्तक कुपोषित बालकांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होऊन फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत कुपोषणाचे प्रमाण झपाट्याने घटले आहे.
जळगाव जिल्हा परिषदेच्या विशेष शोधमोहिमे अंतर्गत कुपोषणाचा शोध घेण्यासाठी जि.प.महिला व बालविकास विभाग आणि आरोग्य विभाग यांच्याकडे कुपोषण सर्वेक्षण करण्याची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. फेब्रुवारी महिन्यात केलेल्या सर्व्हेक्षणात ही आकडेवारी समोर आली आहे.
जिल्ह्यात ३ हजार ६४१ अंगणवाड्या कार्यरत असून अंगणवाडीसेविकांच्या मदतीने ० ते ६ वर्षे वयोगटातील सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. फेब्रुवारी महिन्यात तीव्र कुपोषित श्रेणीमध्ये १ हजार ८१७ बालके तर मध्यम कुपोषित श्रेणीमध्ये ७ हजार २३८ बालके आढळून आली आहे.
दत्तक मोहिमे मुळे कुपोषित बालकांची संख्या घटली आहे. सीईओ डॉ. पंकज आशिया यांनी दत्तक योजना सुरू करून शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना कुपोषित बालके दत्तक देवून त्यांना कुपोषणातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. या मोहिमेला यश आले असून प्रशासकीय प्रयत्नांच्या जोडीला दत्तक योजना प्रभावी ठरल्याने कुपोषणाचे प्रमाण घटत आहे. दत्तक योजनेच्या माध्यमातून जिल्हा कुपोषण मुक्तीसाठी प्रयत्न सुरु असल्याचे डी.के. राऊत यांनी सांगितले.