‘या’ कारणाने आजपासून चारचाकी, दुचाकी वाहने महागणार !

0

नवी दिल्ली- आजपासून चारचाकी व दुचाकी वाहने महाग होणार आहे. कारण आजपासून नवीन वाहन खरेदी करताना कमीत कमी तीन आणि पाच वर्षाचा विमा कवच घ्यावा लागणार आहे. त्यामुळे सुरुवातीला वाहनावरील लाॅन्ग टर्म प्रीमियम पेमेंट्समुळे खर्च वाढणार आहे. असे असले तरी दरवर्षी इन्शुरन्स रिन्यू करण्याची दगदग मिटणार आहे.

सुप्रीम कोर्टाने थर्ड पार्टी इं‍श्‍योरेंस वाढविण्यासाठी हा निर्णय दिला आहे. सर्व वाहनांसाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स आवश्यक आहे. देशातील ५० टक्के वाहन रस्त्यावर उतरलेली आहेत, त्यांनी पुन्हा थर्ड पार्टी इन्शुरन्स रिन्‍यू केलेले नाही.