बिजासन घाटात रस्त्यावर ऑइल पडल्याने दुचाकिंना अपघात

 

शिरपूर(प्रतिनिधी)मुंबई आग्रा महामार्गावर तालुक्यातील राज्य सीमेवर बिजासन घाटात एका अज्ञात वाहनातून रस्त्यावर ऑइल पडल्याने अनेक दुचाकि घसरत अपघात झाल्याची घटना सकाळी घडली असून पत्रकार सचिन जैस्वाल यांनी सदर प्रकाराबद्दल बिजासन पोलिसांना माहिती दिल्याने पोलीस कर्मचार्‍यांनी ऑईलवर माती टाकून दिल्याने पुढील अनर्थ टाळला आहे.
याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार मुंबई आग्रा महामार्गावरील तालुक्यातील राज्य सीमेवरील बिजासन घाटात अज्ञात वाहनातून ऑइल पडल्याने ते ऑइल सुमारे 2 किमी पर्यंत रस्त्यावर पसरले .त्यामुळे उतारावरून येणारे वाहने घसरत असल्याने अपघात होत असून मोठा अपघात होण्याची शक्यता असल्याने पत्रकार सचिन जयस्वाल यांनी सदर घटनेची माहिती बिजासन पोलिसांना दिल्याने बिजासन पोलीस चौकीवरील कर्मचारी कालू सिह व हायवे कर्मचारी धानसिंग इसालाल चालक दिलीप साहू यांनी तात्काळ घटनास्थळी येत रस्त्यावर पडलेल्या ऑईलवर माती टाकून रस्ता सफाई केल्याने पुढील अनर्थ टळला आहे.

मात्र रस्त्यावर पडलेल्या ऑइल वर पोलीस कर्मचारी माती टाकत असतांना शिरपूर तालुक्यातील हाडाखेड येथील दुचाकी स्वार सेंधवा कडून येतांना दुचाकी घसरली.त्याअगोदर ही अनेक दुचाकी घसरल्या मात्र दुखापत झाली नसल्याने ते पुढे मार्गस्थ झाले.