अट्टल दुचाकीचोरांसह फरार संशयितांना एलसीबीकडून अटक

0

दुचाकीचोर शेंदुर्णी व जामनेरचे ; भुसावळ शहरातून फरार ताब्यात

जळगाव- जिल्ह्यातील जामनेर तसेच जळगाव शहरात दुचाकी चोरीप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने शेख कासिम शेख रसूल वय -19 रा . अरबाज चौक जामनेर व राकेश राजु चौधरी वय – 25 रा . गोंधळीपुरा , शेंदुर्णी या मुसक्या आवळल्या आहेत. दोघांकडून गुन्ह्यातील दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक डॉ . पंजाबराव उगले , अपर पोलीस अधीक्षक श्रीमती . भाग्यश्री नवटके यांनी जळगाव जिल्यात मोटर सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहम यांना सुचना व मार्गदर्शन केले होते. त्यानुसार स .फौ . अशोक महाजन ,किशोर राठोड, विनोद सुभाष पाटील , अरूण राजपूत , रणजीत जाधव , नंदलाल पाटील , हरीश परदेशी , भगवान पाटिल , परेश महाजन या पथकाने शेख कासिम शेख रसूल वय -19 रा . अरबाज चौक जामनेर यास ताब्यात घेतले. त्याचे कडेस बिना नंबर ची फॅ शन प्रो दुचाकी मिळून आली. जामनेर शहरातील बाजार पट्टा परिसरातील हॉटेल दिल्ली दरबार समोरून चोरी केली असल्या बाबतची माहिती त्याने दिली.

प्राणघातक हल्लयातील संशयित ताब्यात
भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल प्राणघातक हल्लयाच्या गुन्ह्यात संशयित फरार होता. तो भुसावळ शहरातच असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बापू रोहम यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पोहेकॉ शरीफ काझी, पोना युनुस शेख, पोना सूरज पाटील पथकासह भुसावळातील डी एल हिंदी हायस्कूलजवळून उमर मुश्ताक़ खान वय 24 रा शिवाजी नगर यास ताब्यात घेतले.

जळगावात येताच पथकाकडून ताब्यात
जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या दुचाकी चोरीच्या गुन्हयातील फरार संशयित 17 रोजी शहरातील पंचमुखी हनुमान चौकात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार सहाय्यक फौजदार अशोक महाजन ,पोहेकॉ सुनील दामोदरे, पोकॉ विजय शामराव पाटील , सचिन महाजन, भगवान पाटील नंदलाल पाटील ,दिपक शिंदे ,अरूण वंजारी यांनी रॉकेश राजु चौधरी वय – 25 रा . गोंधळीपुरा , शेंदुर्णी ता . जामनेर यास सापळा रचून मुद्देमालासह ताब्यात घेतले.