वरणगाव परिसरात विजांचे थैमान दोन महिला ठार

( दोघे जण थोडक्यात बचावले, गावावर शोककळा )

 *प्रतिनिधी : वरणगाव* 

 

वरणगांव व परिसरात मंगळवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला . तर यावेळी विज कोसळल्याने शेतात काम करणाऱ्या सुसरी येथील दोन महिला जागीच ठार झाल्या तर जण थोडक्यात बचावले . हि घटना वेल्हाळे शिवारातील शेतात दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली .

 

 

 

याबाबत सविस्तर माहिती अशी की सुसरी ता . भुसावळ येथील तुकाराम शामराव तळेले यांचे वेल्हाळे शिवारातील शेत गट क्रं. ४४३ हे गावातीलच रविंद्र तळेले यांना नफ्याने पेरणीसाठी दिले आहे . त्यानुसार रविंद्र तळेले हे मंगळवारी आपल्या पत्नीसह इतर दोन महीलांना शेती कामासाठी शेतात घेवुन गेले होते . मात्र, दुपारी एक वाजेच्या सुमारास वरणगांव व परिसरात विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाल्याने ममता विनोद पाटील (वय -३३ ) व मिनाक्षी रविंद्र तळेले ( वय -२८ ) या महिला शेतातील कडुनिंबाच्या झाडाखाली आसरा घेण्यासाठी गेले असता अचानक विज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला . हि घटना गावात समजताच ग्रामस्थांनी दोन्ही महिलांना ट्रॅक्टरद्वारे वरणगांव ग्रामीण रुग्णालयात आणले . याबाबत सुसरी गावचे पोलीस पाटील नितीन पुंडलीक पाटील यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे . या घटनेचा सपोनि आशिषकुमार आडसूळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक किशोर पाटील , हवालदार मनोहर पाटील , नागेंद्र तायडे तपास करीत आहेत . तर दोन्ही महिलांपैकी मिनाक्षी रविंद्र तळेले या महिलेचे सांयकाळी उशिरा ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ क्षितीजा हेंडवे यांनी शवविच्छेदन केले . तर मयत अनिता पाटील या महिलेचे आई – वडील हे नागपूर येथून आल्यानंतर बुधवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली . तर या घटनेमुळे सुसरी गावात शोककळा पसरली असून घटनेचे वृत्त पसरताच अनेकांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली होती . तर या घटनेत रविंद्र तळेले व वत्सलाबाई आनंदा तळेले हे दोघेजण सुदैवाने थोडक्यात बचावले असुन मयत दोन्ही महिलांना प्रत्येकी एक मुलगा व एक मुलगी आहे .