उदयनराजे भोसले यांची खासदारकी सोडण्याची तयारी

0

सातारा: साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी फेसबुकच्या माध्यमातून निवडणूक आयोगावर ताशेरे ओढत आपल्या खासदार पदाचा राजीनामा देतो असे म्हटले आहे. निवडणूक आयोगाने साताऱ्यात बॅलेट पेपरवर फेरमतदान घ्यावे असे आव्हान केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर इव्हीएम मशीन मध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. त्या साठी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी निवडणूक आयोग, राष्ट्रपती, न्यायालयात धाव घेतली होती.

आता या वादात उदयनराजे भोसले यांनी उडी घेतली असून निवडणूक आयोगावर फेसबुकच्या माध्यमातून टीका केली आहे. ईव्हीएमद्वारे झालेल्या मतदानानंतर मतमोजणीमध्ये अनेक ठिकाणी झालेले मतदान व मोजलेल्या मतदानात फरक आढळला आहे. तरीही निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालय याबाबत काही बोलत नाही. हा लोकशाहीचा घात असून जे काही व्हायचे ते होऊ द्या. मी आपल्या खासदार पदाचा राजीनामा देतो, व साताऱ्यात काय व्हायचेय ते होऊ द्या. सातारा मतदारसंघातील निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या असे त्यांनी म्हटले आहे.

आपल्या पोस्ट मध्ये त्यांनी बॅलेट पेपरचा खर्च व ईव्हीएमचा खर्च यातील तफावत मांडली आहे. बॅलेट पेपर पेक्षा ईव्हीएमचा खर्च अधिक आहे असे मांडले आहे. एकूण झालेले मतदान आणि मतमोजणीतील तफावत या बद्दल नायोगाने स्पष्टीकरण द्यायला हवे अशी मागणी त्यांनी केली आहे. उदयनराजे भोसले यांच्या पोस्ट मुळे राजकीय क्षेत्रात खळबळ माजली असून निवडणूक आयोग यावर काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.