नवी दिल्ली-देशभरातल्या अॅन्ड्रॉईड मोबाईलमध्ये शुक्रवारी दुपारपासून UIDAI या नावे १८००३००१९४७ हा क्रमांक ऑटो सेव्ह झाला होता. हा क्रमांक अचानक आपल्या मोबाईलमध्ये कसा आला? याचा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र ही गुगलची चूक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
It is emphasised that the said 18003001947 is not a valid UIDAI Toll free number and some vested interest are trying to create unwarranted confusion in the public. 3/n
— Aadhaar (@UIDAI) August 3, 2018
हा ब्रीच ऑफ प्रायव्हसीचा प्रकार आहे की सायबर हल्ला याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली होती. मात्र आता या सगळ्या मागे गुगल असल्याचे स्पष्ट झाले आहे. गुगलने आपल्याकडून झालेल्या या चुकीबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. १८००३००१९४७ हा क्रमांक अँड्रॉईड मोबाईल्समध्ये सेव्ह झाला तेव्हा या क्रमांकाशी आपला काहीही संबंध नसल्याचे UIDAI ने ट्विट करत स्पष्ट केले होते.