नवी दिल्ली – प्रधान मंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोमवारी नमो अॅपद्वारे संवाद साधणार आहेत. घराघरात गॅस उपलब्ध करण्याच्या उद्देशाने १ मे २०१६ रोजी उत्तर प्रदेशच्या बलियामध्ये पंतप्रधान मोदी यांनी प्रधान मंत्री उज्ज्वला योजनेचा शुभारंभ केला. या योजनेसाठी सरकारकडून ८ हजार कोटींचा निधी देण्यात आला आहे. दरम्यान भाजप सरकारला ४ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल रविवारी पंतप्रधानांनी नमो अॅपद्वारे सर्वेक्षण सुरू केले.
या सर्वेक्षणाद्वारे भाजप सरकारचे ४ वर्षातील कार्य, प्रमुख योजना, खासदार आणि आमदारांच्या कामगिरीचे रेटींग करता येणार आहे. तसेच नेत्यांची उपलब्धता, प्रामाणिकपणा, माणुसकी आणि लोकप्रियता या मुद्द्यांवर त्यांचे मुल्यांकन करता येणार आहे. स्वत:च्या मतदारसंघांमध्ये सरकारचे उपक्रम आणि विकासकामांबाबत काय वाटते ते सर्वेक्षणाद्वारे सांगता येणार आहे.