चीनमधील बँकेकडून सरकारने कर्ज घेतलेय: राहुल गांधींचा खळबळजनक दावा

0

नवी दिल्ली: भारत-चीन वादावरून कॉंग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने केंद्र सरकारला लक्ष करत आहेत. अर्थव्यवस्थेसह विविध विषयांवर राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला आहे. चीनने भारतीय भूभागांवर अतिक्रमण केले आहे मात्र मोदी ते मान्य करत नाही असे आरोप केले आहे. चीनने भारतीय जमीन बळकाविल्याचे जर मोदींनी मान्य केले तर त्यांच्या प्रतिमेला धक्का बसेल ही चिंता मोदींना आहे अशी टीका राहुल गांधींनी यापूर्वी केली आहे.

दरम्यान आता राहुल गांधींनी एक खळबळजनक आरोप केला आहे. राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर आरोप करतांना ‘तुम्ही क्रोनोलॉजी समजून घ्या’ असे म्हटले आहे. मोदींनी चिनी लष्कराने नियंत्रण रेषा ओलांडली नाही असे वक्तव्य केले त्याच्या काही दिवसांनी केंद्र सरकारने चीनमध्ये स्थित असणाऱ्या बँकेकडून मोठे कर्ज घेतल्याचा खळबळजनक दावा राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे. त्यात त्यांनी ‘तुम्ही क्रोनोलॉजी समजून घ्या’; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणीही नियंत्रण रेषा ओलांडली नाही असे वक्तव्य केले. त्यानंतर चीन स्थित बँकेकडून मोठे कर्ज घेतले असे सांगितले आहे.

संसदेच्या अधिवेशनाला राहुल गांधी उपस्थित नाहीत. मात्र सातत्याने ते केंद्र सरकारला लक्ष करतांना दिसत आहेत. सोनिया गांधी या उपचारासाठी विदेशात गेल्या आहेत, त्यांच्यासोबत राहुल गांधी गेले असल्याने ते अधिवेशनाला हजर राहु शकले नाही.