पॅरिस : भारताने ऑगस्ट महिन्यात काश्मीरमधून कलम ३७०, ३५ अ कलम रद्द केले होते. पाकिस्तानने भारताविरोधात अनेक देशांकडे याविषयी तक्रार केली होती, त्यात पाकिस्तानला यश आले नाही. आता पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र संघाच्या यूनेस्कोमध्ये काश्मीरशिवाय अयोध्या निकालाचा मुद्दाही उचचला आहे. यावर भारताने पाकला चोख उत्तर देत भारताची अखंडता आणि अंतर्गत प्रकरणात दखल देण्याचा प्रयत्न करतोय. मात्र स्वत:च्या देशात मानवाधिकाराची पायमल्ली करत असल्याचे म्हटले आहे.
पाकिस्तानने काश्मीरसोबत सुप्रीम कोर्टाने अयोध्या प्रकरणावर दिलेल्या निकालावर भाष्य केलं. भारतानेही जशास तसं उत्तर देत आमच्या शेजारील राष्ट्राला दुसऱ्याच्या घरात बघण्याची सवय लागली आहे. स्वत:च्या घरातील कारनामे लपविण्यासाठी भारताच्या अंतर्गत प्रकरणावर खोटे दावे करत आहे. मात्र त्यांच्या देशात दहशतवाद्यांनी पोखरलं आहे. अल्पसंख्याकांवर अत्याचार सुरु आहेत. भारताच्या प्रतिनिधीने पाकिस्तानच्या कारनाम्याची यादी यावेळी वाचून दाखविली.
काही दिवसापूर्वीच सुप्रीम कोर्टाने अयोध्या प्रकरणावर ऐतिहासिक निर्णय दिला. यूनेस्कोमध्ये अयोध्या प्रकरणावर पाकिस्तानने भाष्य केलं. त्यावर भारताने हा मामला आमच्या राष्ट्रातील अंतर्गत आहे. यात हस्तक्षेप करण्याचा कोणताही अधिकार तुम्हाला नाही अशा शब्दात पाकिस्तानला बजावलं आहे.