भडगाव- बाजरी काढणीसाठी शेतात गेलेल्या विवाहितेचा पदर थ्रेशर मशीनमध्ये अडकल्याने विवाहिता ओढली जावून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. सोनी श्रावण मोरे (वय 25) असे मृत विवाहितेचे नाव आहे. भिका जयराम पाटील यांच्या शेतात बाजरी काढण्याचे काम सुरू असताना विवाहितेचा साडीचा भाग मशीनमध्ये अडकला व गंभीर मार लागून ती जागेवरच मृत झाली. शुक्रवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर खेडगावात शोककळा पसरली. मृत विवाहितेच्या पश्चात सहा महिन्यांचा चिमुरडा मुलगा व दोन मुली असा परीवार आहे. सोनी मोरे या खेडगाव येथे वडील चैत्राम सोनवणे यांच्याकडेच वास्तव्यास होत्या.