Union Budget 2020 : करदात्यांना मोठा दिलासा !

0

नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सकाळी ११ वाजता २०२०-२१ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली आहे.

-अर्थसंकल्पीय भाषण संपलं, लोकसभेची कार्यवाही ३ फेब्रुवारीपर्यंत स्थगित

-आधार कार्डवर तातडीने पॅन कार्ड देण्यासाठी प्रणाली तयार होणार – अर्थमंत्री

– बळीराजाला १६ कलमी कार्यक्रमांचं बळ

-नवीन वैयक्तिक प्रत्यक्ष प्राप्तीकर रचना – ५ लाखापर्यंत – करमुक्त, ५ ते ७.५ लाख – १० टक्के,७.५ ते १० लाख – १५ टक्के,१० ते १२.५ लाख – २० टक्के

-१० ते १२.५ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असल्यास २० टक्के कर

-५ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त, ७.५ लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या वर्गासाठी कराचा दर १० टक्के, वार्षिक उत्पन्न ७.५ ते १० लाख असणाऱ्या वर्गासाठी १५ टक्के

-बँक नियामक कायद्यातही बदल केला जाईल, यातून बँकिंग प्रशासनात अधिक सुलभता येईल – अर्थमंत्री

– २०२० भारतात जी-२० परिषद होत आहे, याच वर्षात आपल्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. याच्या तयारीसाठी १०० कोटी रुपयांची तरतूद – अर्थमंत्री

-अराजपत्रित पदांसाठी होणाऱ्या भरती प्रक्रियेत बदल होईल, तरुणांना सध्या विविध परीक्षांसाठी उपस्थित रहावं लागतं, यात परिश्रम खर्च होतात. यासाठी नव्या संस्थेची स्थापना होईल – अर्थमंत्री

-करदात्यांसाठी चार्टर हा आता कायद्याचा भाग असेल, करदात्यांचा कोणताही छळ होणार नाही, प्रत्येकाचा विश्वास जिंकला जाईल – अर्थमंत्री

-भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, राहणीमान सुधारणा यावर भर – अर्थमंत्री

-पर्यावरण आणि वातावरण बदल – प्रमाणाबाहेर जास्त कार्बन उत्सर्जन करणारे औष्णिक विद्युत प्रकल्प बंद करावेत. त्यांना पर्याय दिला जाईल – अर्थमंत्री

-संस्कृती आणि पर्यटन – देशातील पाच पुरातत्व स्थळांचा विकास केला जाईल, हरियाणा, उत्तर प्रदेश, आसाम, गुजरात, तमिळनाडू या राज्यातील स्थळांचा समावेश

-एससी आणि ओबीसींसाठी ८५ हजार कोटी, एसटीसाठी ५३७०० कोटी रुपये – अर्थमंत्री

-पोषण आहार योजनेसाठी ३५ हजार कोटी रुपये – अर्थमंत्री

– खाजगी क्षेत्राला डेटा सेंटर पार्क निर्मिती करण्यासाठी आवाहन

– राष्ट्रीय गॅस ग्रीडचं जाळं १६ हजार २०० किमीने वाढवणार – अर्थमंत्री

– विमान वाहतूक जगाच्या तुलनेत भारतात वेगाने वाहतूक आहे, २०२४ पर्यंत आणखी १०० विमानतळांची निर्मिती होईल – अर्थमंत्री

– जलमार्गही पूर्ण होत आहेत, आसामला जोडणारा जलमार्ग २०२२ पर्यंत पूर्ण होईल – अर्थमंत्री

– दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे २०२३ पर्यंत पूर्ण होईल, इतर मोठ्या महामार्गांनाही निधी – अर्थमंत्री

– पायाभूत सुविधा निर्मितीसाठी प्रकल्प, यामुळे युवा इंजिनीअर्सला फायदा होईल – अर्थमंत्री

– पायाभूत सुविधांवर खर्च केला जाईल हे पंतप्रधानांनी सांगितलं होतं, याअंतर्गत विमानतळ, बस स्टँड, रेल्वे स्टेशन, घर निर्मिती अशा विविध प्रकल्पांचं काम सुरू आहे – अर्थमंत्री

– प्रत्येक जिल्हा निर्यातीचं केंद्र व्हावा हे पंतप्रधानांचं लक्ष्य आहे, यावरही भर दिला जात आहे – अर्थमंत्री

– 2025 पर्यंत भारत टीबी मुक्त करणार, टीबी हारेगा, भारत जितेगा अभियान राबवणार – अर्थमंत्री

– डिप्लोमासाठी 2021 पर्यंत नवीन संस्था उभारणार – अर्थमंत्री

– राष्ट्रीय पोलीस विद्यापीठाची अर्थमंत्र्यांकडून घोषणा

– पीपीपी तत्वावर जिल्हा रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय जोडणे शक्य आहे, केंद्र सरकार यासाठी पुढाकार घेईल – अर्थमंत्री

– तरुण इंजिनीअर्सना एक वर्षासाठी इंटर्नशीप, स्थानिक स्वराज्य संस्थांकडून ही इंटर्नशीप दिली जाईल – अर्थमंत्री

– स्वच्छ भारत योजनेसाठी 12 हजार 300 कोटींची तरतूद – अर्थमंत्री

– आर्थिक विकासामध्ये उद्योग, वाणिज्य हे भाग महत्त्वाचे – अर्थमंत्री

– पीपीपी तत्वावर जिल्हा रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय जोडणे शक्य आहे, केंद्र सरकार यासाठी पुढाकार घेईल – अर्थमंत्री

– जैविक शेती, झिरो बजेट शेती या मुद्द्यांचाही १६ सूत्रा कार्यक्रमात समावेश – अर्थमंत्री

– नागरी उड्डाण मंत्रालयाकडून ‘कृषी उड्डाण’ योजना, आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत मार्गावर ही योजना असेल. शेतकऱ्यांना यामुळे फायदा होईल – अर्थमंत्री

– २० लाख शेतकऱ्यांना सोलार पंप बसवण्यासाठी मदत केली जाणार, यामुळे डिझेलवरील खर्च वाचेल – अर्थमंत्री

– २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यावर भर, सिंचन योजनेलाही बळ देणार – अर्थमंत्री

– डिजीटल प्रशासनाच्या माध्यमातून अधिक सुलभ सुविधा देण्यावर भर, पेन्शनच्या माध्यमातून सामाजिक सुरक्षा यावर भर – अर्थमंत्री

– 6.11 कोटी शेतकऱ्यांसाठी विमा योजना – अर्थमंत्री

– पाण्याची कमतरता असणाऱ्या १०० जिल्ह्यांमध्ये पाण्याच्या नियोजनासाठी काम करणार – अर्थमंत्री

– किसान रेल योजना सुरू करून दूध, मांस, मासे वाहतूक करणे सुसह्य करणार – अर्थमंत्री

– तरुण इंजिनीअर्सना एक वर्षासाठी इंटर्नशीप, स्थानिक स्वराज्य संस्थांकडून ही इंटर्नशीप दिली जाईल – अर्थमंत्री

– उच्च दर्जाचं शिक्षण देण्यासाठी परकीय गुंतवणूक – अर्थमंत्री

– २०३० पर्यंत भारतात जगातील सर्वाधिक कामकाज करणारा वर्ग असेल, यासाठी नोकऱ्यांची आणि शिक्षणाची गरज असेल. लवकरच नवीन शिक्षण धोरण जाहीर होईल – अर्थमंत्री

– पीएम किसान योजनेचा शेतकऱ्यांना लाभ, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं सरकारचं लक्ष्य – अर्थमंत्री

– आरोग्य, शिक्षण, रोजगारावर सरकारचा भर, अर्थसंकल्पात गरीबांसाठी खास योजना – अर्थमंत्री

– महागाईवर नियंत्रण ठेवण्यात केंद्र सरकारला यश – अर्थमंत्री

– २००९ ते २०१४ या काळात चलन फुगवटा १०.५ टक्क्यांच्या घरात होता – अर्थमंत्री

– महत्त्वाकांक्षी भारत, सर्वांचा आर्थिक विकास आणि संरक्षित समाज, हे बजेटचं मुख्य ध्येय – अर्थमंत्री

– भारतातील थेट परदेशी गुंतवणूक २०१४ ते २०१९ दरम्यान २८४ अब्ज अमेरिकी डॉलर वर पोहोचली – अर्थमंत्री

– देशातील गरजू नागरिकांना स्वस्त घरं उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करणार – अर्थमंत्री

– जीएसटीमुळे एकच टॅक्स, त्यामुळे देशाला फायदा झाला, वस्तूंवरील कर कमी झाला, लघू आणि मध्यम उद्योगांना फायदा – अर्थमंत्री

– जीएसटीमुळे काही अडचणी आल्या, मात्र हा कर कमी असल्यानं कुटुंबाचा मासिक खर्च सरासरी 4 टक्क्यांनी कमी झाला – अर्थमंत्री

– कृषी क्षेत्रासाठी १६ सूत्री कार्यक्रम, राज्य सरकारचा अंमलबजावणीत समावेश, पिण्याचे पाणी या मुद्द्यांचा समावेश –  अर्थमंत्री

– पाण्याची कमतरता असणाऱ्या १०० जिल्ह्यांमध्ये पाण्याच्या नियोजनासाठी काम करणार – अर्थमंत्री

– शेतीसाठी सौरऊर्जा वापरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम सुरू – अर्थमंत्री

– देशातील सर्व राज्यांशी समन्वय राखून योजना मार्गी लावणार – अर्थमंत्री

– शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध – अर्थमंत्री

– डिजिटल प्रशासनाच्या माध्यमातून अधिक सुलभ सुविधा देण्यावर भर; पेन्शनच्या माध्यमातून सामाजिक सुरक्षेवर भर देणार – अर्थमंत्री

– प्रत्येक घरी स्वच्छ पाणी पोहोचवण्यास सरकारला यश – अर्थमंत्री

– २७ कोटी नागरिकांना दारिद्र्यरेषेतून बाहेर काढण्यात सरकारला यश – अर्थमंत्री

– देशातील बँकांची स्थिती सुधारली आहे – अर्थमंत्री 

– सबका साथ सबका विकास यामुळे आत्मविश्वासाने योजनांच्या अंमलबजावणीची गती अनेक पटींनी वाढली आहे. भारत आज जगातील विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये आघाडीवर आहे. २०१४ आणि २०१९ च्या दरम्यान मोदी सरकारच्या धोरणांमुळे २८४ अब्ज डॉलर्सची एफडीआय देशात आल्याने व्यवसायात वाढ झाली – अर्थमंत्री

– महागाईवर नियंत्रण ठेवण्यात केंद्र सरकारला यश – अर्थमंत्री

– अर्थव्यवस्थेची मूलतत्त्वे मजबूत आहेत, चलनवाढही चांगली झाली आहे. देशातील युवकांना रोजगार देण्याचा प्रयत्न करणार – अर्थमंत्री

– निर्मला सीतारामन यांनी वाचली पंडित दीनानाथ कौल यांची कविता…..

हमारा वतन खिलते हुए सालीमार बाग जैसे,
हमारा वतन डल में खिलते हुए कमल जैसा,
नवजवनों के गर्म खून जैसा,
मेरा वतन तेरा वतन, हमारा वतन,
दुनिया का सबसे प्यारा वतन

पंडित दीनानाथ कौल