अर्थमंत्र्यांनी राजीनामा द्यावा-राहुल गांधी

0

दिल्ली-भारतीय बँकांना कोट्यवधींचा चुना लावून परदेशात पलायन केलेल्या मद्य सम्राट विजय मल्ल्याने आपण भारत सोडण्यापुर्णी अर्थमंत्र्यांना भेटलो होतो असे वक्तव्य काळ ब्रिटनच्या न्यायालयात केले. या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अर्थमंत्री अरुण जेटलींच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मल्याच्या विधानानंतर भाजपाला लक्ष केले आहे. मल्ल्याचे विधान गंभीरतेने घेणे गरजेचे असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश द्यावेत असे राहुल गांधींनी म्हटले आहे. तसेच याप्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत अर्थमंत्री अरुण जेटलींनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही राहुल यांनी केली आहे.

अर्थमंत्र्यांचे स्पष्टीकरण
भारत सोडण्यापूर्वी आपण अर्थमंत्र्यांची भेट घेतल्याचा मद्य व्यापारी विजय मल्ल्याचा दावा अरुण जेटली यांनी फेटाळला आहे. ब्लॉगच्या माध्यमातून त्यांनी विजय मल्ल्यांवर टीकास्त्र सोडले आहे. भारत सोडण्यापूर्वी तडजोडीसाठी आपण अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली होती, हे विजय मल्ल्याचे वक्तव्य तथ्यात्मकरित्या पूर्णपणे खोटे आहे. २०१४ पासून आतापर्यंत मी मल्ल्या यांची भेट घेतलेली नाही किंवा कधी वेळही दिलेली नाही. त्यामुळे त्यांची भेट घेण्याचा प्रश्नच नाही, असे ते म्हणाले.