अर्थव्यवस्थेला ‘बुस्टर डोस’; केंद्राकडून विशेष योजना जाहीर

0

नवी दिल्ली: कोरोनामुळे भारतीय अर्थव्यवस्था ढासळली आहे. सर्वच क्षेत्राला आर्थिक फटका बसल्याने जीडीपी जवळपास २४ टक्क्यांनी कोसळले. अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी आरबीआयसह केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. दरम्यान मंदावलेली अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी देण्यासाठी केंद्र सरकारने चार पाऊले टाकली आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी आज सोमवारी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन सरकारकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. केंद्र सरकारने खरेदीशक्ती वाढवण्यासाठी सरकारने ही योजना आणली आहे.

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना सण उत्सवांसाठी १० हजार रुपये अ‍ॅडव्हान्स देण्याची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना एलटीसीच्या ऐवजी कॅश व्हाऊचर्स दिली जाणार आहेत. राज्यांना ५० वर्षांपर्यंत १२ हजार कोटींचे बिनव्याजी कर्ज दिले जाणार. अर्थसंकल्पातील खर्चाव्यतिरिक्त पायाभूत विकासावर २५ हजार कोटी अतिरिक्त खर्च करण्यात येणार आहे.