नवीन भारत साकारण्याचा प्रयत्न; राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात !

0

नवी दिल्ली- केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पाला सुरुवात झाली आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांच्या भाषणात सरकारच्या कामगिरीचा आढावा घेतला.

राष्ट्रपतींनी यावेळी सरकारच्या पाच वर्षाच्या कामगिरीचा आढावा घेतला. या पाच वर्षात सरकारने नवीन भारत साकारण्याचा प्रयत्न केला आहे. विविध योजनेचा लाभ सामान्य जनतेला दिला आहे असे राष्ट्रपतींनी यावेळी सांगितले.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली आहे असे राष्ट्रपती यांनी त्यांच्या अभिभाषणात सांगितले.