नवी दिल्ली: गेल्या महिन्याभरापासून केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना प्रकृती विषयी समस्या उद्भवत आहेत. २ ऑगस्टला त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातून ते बरे झालेत. त्यानंतर श्वसनाला त्रास जाणवू लागल्याने त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. आता पुन्हा त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाली असून शनिवारी रात्री त्यांना पुन्हा दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. श्वासोच्छवासाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना पुन्हा एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे.
सध्या अमित शहा यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती देखील स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. अमित शाह यांना २ ऑगस्ट रोजी करोनाची लागण झाली होती. अमित शाह यांनीच स्वत: ट्विट करत ही माहिती दिली होती. १४ ऑगस्ट रोजी त्यांनी आपली करोना चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती दिली होती.