अमित शहांनी राष्ट्रीय पोलीस संग्रहालयाला दिली भेट !

0

नवी दिल्ली: लोकसभेत मोठा विजय मिळवीत भाजपप्रणीत एनडीए सरकार दुसऱ्यांदा सत्तेत आले आहे. ३० में रोजी मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यांच्याबरोबर मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना गृहमंत्रीपद देण्यात आले आहे. दरम्यान पदभार स्वीकारल्यानंतर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रीय पोलीस संग्रहालयाला भेट दिली. यावेळी अमित शहांनी शहीद पोलिसांना श्रद्धांजली अर्पण केली.