केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांना कॉंग्रेसकडून श्रद्धांजली !

0

बंगळुरू – केंद्रीयमंत्री रसायनमंत्री तसेच संसदीय कामकाजमंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते अनंत कुमार यांचे रात्री ५९ व्या वर्षी निधन झाले. बंगळुरूच्या बसवानागुडी येथील श्री.शंकर कँसर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अनंत कुमार यांना कर्करोगाने ग्रस्त होते. अनंत कुमार यांच्या निधनामुळे राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त होत आहे. कॉंग्रेसने देखील शोक व्यक्त करत अनंतकुमार यांना आदरांजली वाहिली आहे. तसेच या दु:खात कुटुंबीयांसह असल्याचे म्हटले आहे. उद्या त्यांच्यावर   अंत्यसंस्कार केले   जाणार आहे.