नवी दिल्ली: संसदेचे अधिवेशन सुरु आहे. यावेळी सर्वांनाच आश्चर्यचकित करणारी एक घटना घडली. भाजपचे केंद्रीयमंत्री मनसुख मंडाविया हे चक्क सायकलने संसदेत आले. मनसुख मंडाविया हे भाजपचे गुजरातमधील राज्यसभा सदस्य आहे. ते त्यांच्या साध्या राहणीमानामुळे प्रसिद्ध आहेत.
मनसुख मंडाविया यांच्याकडे रासायनिक खत विभागाचे मंत्रीपद आहे.
मंत्री असतानाही कोणताही लवाजमा किंवा सुरक्षा रक्षक न बाळगता ते बिनधास्तपणे सायकलने फेरफटका मारत असतात.