नवी दिल्ली-एनडीएमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापले आहे. भाजपवर सहयोगी पक्ष सातत्याने विविध मुद्द्यावरून दबाव टाकतांना दिसत आहे. पाच राज्यातील निवडणुकीनंतर भाजपवर सहयोगी पक्षांचा दबाव वाढतांना दिसत आहे. दरम्यान आता अपना दल (एलजेपी) पक्षाच्या नेत्या केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांनी भाजपच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. अपना दल हे पक्ष एनडीएचे घटक आहे. उत्तर प्रदेशमध्ये अपना दल या पक्षाचे स्थान चांगले आहे.
अपना दलचे प्रमुख आशिष पटेल यांच्या वक्तव्यानंतर अनुप्रिया पटेल यांनी भाजपने पाच राज्यात झालेल्या पराभवापासून धडा घ्यायला हवा असा टोला लगावला आहे.