माजी केंद्रीय मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात; दोन जवान ठार !

0

चंद्रपूर: माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर चंद्रपूरहून नागपूरला जात असताना त्यांच्या ताफ्यातील वाहन जामजवळच्या कांडळी नदीजवळ कंटेनरला धडकल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात सीआरपीएफचे दोन सुरक्षा जवान ठार तर तीन जण जखमी झाले आहेत. हंसराज अहीर यांचे वाहन पुढे निघून गेल्याने ते या अपघातातून वाचले आहेत.

समोर अचानक आलेल्या माकडाला वाचवण्यासाठी कंटेनरच्या चालकाने ब्रेक लावल्याने मागून येणारी सुरक्षा जवानांची गाडी या धडकली. दोन्ही गाड्यांचा वेग अधिक असल्याने सुरक्षा रक्षकांच्या गाडीचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. या गाडीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे पाच सुरक्षा जवान होते. हंसराज अहिर हे समोरच्या गाडीत होते. नागपूरच्या ऑरेंज सिटी हॉस्पीटलमध्ये जखमी जवानांना दाखल केले असून, भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली आहे.