नवी दिल्ली-दोन महिला पत्रकारांनी त्यांच्यावर ‘द टेलीग्राफ’चे संपादक आणि आताचे परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री असलेले एम.जे.अकबर यांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे. पत्रकार प्रिया रामाणी यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री एम. जे. अकबर यांना आरोप केल्यानंतर आज त्यांच्या माजी सहकारी प्रेरणा सिंग बिंद्रा यांनी लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे.
काल रमणी यांनी ट्विटवर हा खुलासा केला होता. प्रिया रामाणी ह्या ‘द टेलीग्राफ’मध्ये पत्रकारिता करीत होत्या. मंत्री अकबर हे त्यावेळी द टेलीग्राफचा संस्थापक संपादक होते. या आरोपांबद्दल माध्यमांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याकडून प्रतिक्रिया मागितली असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. माध्यमांच्या या प्रश्नावर त्यांनी चुप्पी साधली.