नवी दिल्ली-दहा महिला पत्रकारांनी केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले आहे. आरोप सुरु झाले तेंव्हा मंत्री एम.जे.अकबर नायजेरिया दौऱ्यावर होते, ते आज दौऱ्याहून परतले असून त्यांनी आज आपला राजीनामा ई-मेलवर पाठविला आहे. आज सकाळी भारतात परतल्यानंतर त्यांच्याशी माध्यमांनी संवाद साधण्याचा प्रयत्न करून प्रतिक्रिया मागितली असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.