बेंगलोर बेकरी मध्ये पहाटे चार ते पाचच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकान फोडून एक लाख रुपयांची रोकड केली लंपास

शहादा |

येथिल बसस्थानका समोरील मुख्य रस्त्यावर असलेले आयंगर बेंगलोर बेकरी मध्ये पहाटे चार ते पाचच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकान फोडून एक लाख रुपयांची रोकड चोरी केल्याचा प्रकार आज सोमवारी दि.१५ रोजी सकाळी उघकीस आली आहे. याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील बस स्थानकासमोरील अय्यंगार बेंगलोर बेकरी अज्ञात चोरट्यांनी पहाटे चार ते पाच वाजे दरम्यान बेकरीच्या मागील बाजूस असलेल्या शटरला तोडण्याच्या प्रयत्न केला मात्र ते न तुटल्यानंतर त्यांनी बाथरूमच्या वरील खिडकीची जाळी तोडत दोन चोरट्यांनी हा प्रवेश करून बेकरीमध्ये इलेक्ट्रिक बिल भरण्याची रक्कम व दोन दिवसाच्या ग्राहकांच्या गोळा झालेला पैसा असा एकूण एक लाख रुपये रोख रक्कम लंपास केली आहे या बेकरीत सकाळी काम करायला आलेल्या कर्मचाऱ्यांना गल्ला व त्याच्या जवळील कपाट अस्ताव्यस्त केलेले दिसले त्यानंतर त्यांनी संपूर्ण बेकरीची पाहणी केली असता मागील बाजूस असलेले शटर उचकवण्याच्या प्रयत्न करीत केलेला दिसून आला तसेच बेकरीतील बाथरूमच्या वरील खिडकीची जाळी तोडलेली दिसल्याने त्यांनी बेकरीचे चालक सागर शिवकुमार शेट्टीगिरे यांना सारा प्रकार सांगितला त्यांनी तात्काळ पोलिसांना घडलेली घटना कळविल्यानंतर घटनास्थळी पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत हे आपल्या कर्मचाऱ्यांसह दाखल झाले. दुकानातील ५०० रुपयांच्या १०० नोटा, २०० रुपयांच्या १०० नोटा, १०० रुपयांच्या १०० नोटा, ५० रुपयांच्या ४०० नोटा अश्या ५० हजार रुपये रोकड चोरून नेली आहे. चोरट्यांनी दुकान येतील सी.सी.टी.व्हींची तोडफोड केली असून चोरट्यांनी या दुकानाच्या आजूबाजूलाही काही दुकानेंवर डल्ला मारल्याची चर्चा शहरात सुरू होती.

याप्रकरणी सागर शिवकुमार शेट्टीगिरे यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक श्री.चव्हाण अधिक तपास करीत आहेत.