पाचोरा महायुतीचा विजयी संकल्प मेळाव्याला प्रतिसाद
पाचोरा – एकीकडे देशाची सुरक्षा व कारभार अतिशय सक्षमपणे नरेंद्र मोदी पाहता आहेत. आपल्या ५६ इंचाची छातीने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून पुलवामा शहिदांचा बदला घेता आहेत. तर देशद्रोहाचे कलम रद्द करण्याची भाषा करणार्या काँग्रेस बरोबर छप्पन्न पक्षांची तकलादू बेभरवशाची आघाडी आहे. त्यामुळे भाजप सेना महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मी नरेंद्र मोदी आहे असे समजून देशाच्या विकासासाठी व नरेंद्र मोदींचे हाथ बळकट करण्यासाठी महायुतीचे उमेदवार आमदार उन्मेष पाटील यांना विजयी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावे असे आवाहन राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.
ते आज पाचोरा भडगाव मतदारसंघातील महायुतीचे कार्यकर्त्यांचे विजय संकल्प मेळाव्यात बोलत होते. यावेळी दहा हजार कार्यकर्ते उपस्थित होते. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी हर हर मोदी घर घर मोदींच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.यावेळी भाजप माजी सभापती सुभाष पाटील, जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे, शिवसेनेचे माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील,आर पी आय जिल्हा प्रमुख आनंद खरात, बेटी बचाव बेटी पढाव संयोजिका डॉ. अस्मिता पाटील, शिवसेनेचे लोकसभा संपर्क प्रमुख संजय सावंत, शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख व जिल्हा परिषदेचे शिवसेनेचे गटनेते रावसाहेब पाटील. नगराध्यक्ष संजय गोहिल, बाजार समितीचे सभापती सतीश शिंदे, युवा नेते अमोल शिंदे,पाचोरा बाजार समितीचे सभापती बन्सीलाल पाटील, तसेच जिल्हा परिषदेचे सदस्य, अमोल नाना पाटील युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष, भडगाव शहराध्यक्ष शैलेश पाटील, पं.स. सदस्या डॉ. अर्चनाताई पाटील, अलकाताई पाटील, भडगावचे नगराध्यक्ष अतुल पाटील उपस्थित होते.
युती भक्कम झाल्याने राष्ट्रवादीला कायमची गाडा
आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एक आहोत आता आमची युती अभेद्य आहे दादा तुम्ही काळजी करू नका तुम्ही जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने लाखोंच्या लीडने निवडून येणार आहे, अशी गर्जना सहकारमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली.
आ. किशोर पाटील यांनी पाचोरा तालुक्यातील पिण्याचे पाण्याचे प्रश्न उपस्थित करून ना. महाजन यांनी माझ्या तालुक्यात लक्ष द्यावे. छोटे छोटे कामे झालीत तर पाचोरा भडगाव तालुका सुजलाम सुफलाम होईल असे सांगून ते म्हणाले की सेवाभावी वृत्तीचा हा माझा मित्र उन्मेष हे देशाचे एक नंबरचे कार्य सम्राट खासदार होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.