भडगाव येथे बूथ प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळाव्यात ना. चंद्रकांत पाटील यांचे आवाहन
भडगाव – भाजपची सत्ता आल्यास जम्मू – काश्मीर मधील ३७० कलम रद्द करू. त्यासाठी दोन तृतीयांश म्हणून ३७३ जागा मिळणे आवश्यक आहे. ते कलम रद्द केल्यास देशातील कोणत्याही माणसाला काश्मिरात जमीन विकत घेता येणार आहे. देशाच्या सुरक्षितेसाठी भाजपला मतदान करण्याचे आवाहन राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भडगावात केले.
भाजपाचे उमेदवार उन्मेश पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित बूथ प्रमुख व कार्यकर्ते मेळाव्यात ते बोलत होते. ना. पाटील पुढे म्हणाले की, पाच वर्षात नरेंद्र मोदींना देशाचा चेहरा मोहरा बदलवला विरोधक पंतप्रधानांनी संसार केला नाही. ते महिलांचे दुःख काय समजतील अशी टीका करतात पण त्यांनी महिलांना धुरात स्वयंपाक करणार्या महिलांना उज्ज्वला योजनेंतर्गत पाच कोटी कनेक्शन दिले. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी साडेचार वर्षात ८ लाख हेक्टर सिंचन क्षेत्र वाढवले. शेतकर्यांना आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी दिली असून योजनेचा लाभ देणे सुरु असून १३ हजार कोटी रुपये शिल्लक आहेत. मराठ्यांना १६ टक्के आरक्षण दिले धनगर समाजाला आदिवासी समाजाला मिळणार्या सुविधा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे शासनाने प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम केले आहे, आमदार उन्मेश पाटील यांच्या रूपाने एक उच्चशिक्षित व अभ्यासू उमेदवार भारतीय जनता पक्षाने दिल्याने ते लाखांच्या बहुमताने विजयी होतील यात शंका नसल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
यावेळी आमदार किशोर पाटील यांनी शासनाने रेंगाळल्या गिरणा नदीवरील बलून बंधार्याना चालना दिल्याचे सांगितले. भडगाव शहरासाठीचा बंधार्याचे काम लवकरच मार्गी लागेल असे सांगत माझे मित्र आमदार उन्मेश पाटील यांना मतदान करण्याचे आश्वासन दिले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्वला पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष अतुल पाटील, राजेंद्र पाटील, विकास पाटील, मधुकर काटे, रामकृष्ण पाटील, डॉ .विलास पाटील, सोमनाथ पाटील, अमोल पाटील, डॉ. संजीव पाटील, एस दि खेडकर, डॉ .अस्मिता पाटील, मनोहर चुअधारी, आनंद खरात, डॉ. प्रमोद पाटील, संजय पाटील, जालिंदर चित्ते, डॉ. अर्चना पाटील , अलकाताई पाटील, इम्रान अली सैय्यद, युवराज पाटील, शिंदीचे अनिल पाटील, राजेंद्र मोरे, जेके पाटील, संजय पाटील, सतिश शिंदे, नूतन पाटील, संजय सोनवणे, जगन भोई, प्रदीप महाजन, गुढ्याचे राजेंद्र पाटील, निलेश पाटील रणजीत भोसले, निलेश महाजन आदी उपस्थित होते. प्रस्ताविक अमोल पाटील यांनी केले जे.के.पाटील यांनी सूत्रसंचालन केले प्रशांत कुंभारे यांनी आभार मानले.
बारामती व माढाही जिंकू
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यानी सांगितले की, राष्ट्रवादीकडे चार जागा होत्या आता त्यापैकी माढा व बारामती पण काढून घेऊ असे सुतोवाच केले. देशात भाजपाचे सरकार येईल हे सर्वजण मान्य करायला लागले आहेत. एवढेच नाही तर शरद पवारही ते मान्य करायला लागले आहेत, असे त्यानी आपल्या भाषणातून सांगितले.