भुसावळ प्रतिनिधी –
येथील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात दिनांक 17 जानेवारी रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे जळगाव जिल्ह्यातील प्राध्यापकांच्या पदाचे मूल्यमापन करण्या साठी आवश्यक असणारे उन्नत आभिवृत्ती मूल्यमापन शिबिर संपन्न झाले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जळगाव जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापकांना शासनाच्या आदेशानुसार मूल्यमापन करण्यासाठी आयोजित या शिबिराचे उद्घाटन विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्राध्यापक डॉ एस टी इंगळे यांचे हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी आयोजित उद्घाटन समारंभास शासनाचे प्रतिनिधी म्हणून नागपूर येथील इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स चे वरिष्ठ प्राध्यापक प्रा डॉ सी पी चौधरी आणि प्रा. डॉ सुनील आर पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर पी फालक आणि मूल्यमापन शिबिराचे समन्वयक म्हणून प्राध्यापक डॉ संजय चौधरी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व. दादासाहेब देविदास नामदेव भोळे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन तसेच सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
आपल्या उद्घाटनपर भाषणात उद्घाटक प्राध्यापक डॉ एस टी इंगळे म्हणाले की या शिबिरात कालबध्द पदोन्नती मध्ये स्टेज एक मधुंन स्टेज दोन, तसेच स्टेज दोन मधून स्टेज तीन ची पदोन्नती साठी मूल्यमापन केले जाईल. पण ही पदोन्नती होत असताना प्रत्येक प्राध्यापकाने महाविद्यालय आणि समाजाला आपल्याला शिक्षक म्हणून काय द्यायचे आहे याचे अवलोकन केले पाहिजे. नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी पुढील वर्षापासून होत असल्याने आपल्याला विद्यार्थ्याना अत्यंत उपयोजित ज्ञान द्यावयाचे असून प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचे कौशल्य विकसित करता येईल अश्या पद्धतीने शिकवण्यासाठी तयार व्हायचे आहे. असे झाल्यास या मूल्यमापन शिबिरात झालेली पदोन्नती फलद्रूप होईल.
आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ आर पी फालक यांनी पदोन्नती साठी उपस्थित झालेल्या सर्व प्राध्यापक शुभेछ्या दिल्यात. छाननी समितीने प्राध्यापकांसाठी तयार केलेल्या विविध सुविधांची कल्पना देवून कमीत कमी अडचणी आणि कमीत कमी वेळात मूल्यमापनाची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन दिल्याचे सांगितले. या शिबिरात जळगाव जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील विविध विषयांच्या 122 प्राध्यापकांच्या अकेडमिक लेव्हल 10 ते अकेडमिक लेव्हल 11 व अकेडमिक लेव्हल 11ते अकेडमिक लेव्हल 12 चे प्रस्ताव मूल्यमापनासाठी तपासण्यात येवून त्यांची शिफारस पदोन्नती साठी करण्यात आली आहे.
कार्यक्रमात उपस्थित पाहुण्यांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर पी फालक, कार्यक्रम समन्वयक प्राध्यापक डॉ संजय चौधरी आणि प्राध्यापक डॉ आर बी ढाके यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ दयाघन एस राणे यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. डॉ माधुरी पाटील यांनी केले
या शिबिराच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयातील डॉ जी पी वाघुळदे, प्रा डॉ माधुरी पाटील प्रा निर्मला वानखेडे, प्रा संजय चौधरी प्रा डॉ राजेश ढाके, डॉ संजय चौधरी, प्रा आर डी भोळे, डॉ अनिल सावळे, डॉ, जयश्री सरोदे, प्रा श्रेया चौधरी, डॉ अंजली पाटील,प्रा संगीता धर्माधिकारी डॉ जे बी चव्हाण प्रा एस एस पाटील, प्रा दिपक जैस्वार , प्रा धनश्री नेहते, प्रा कामिनी चौधरी, प्रा जागृती सरोदे, प्रा आरती नवघरे, प्रा आरती भोई, प्रा सुशीला बाटे, प्रा गायत्री नेमाडे,प्रा के व्ही धांडे,पराग पाटील, वाय डी चौधरी, राजेश पाटील, प्रमोद नारखेडे, किरण पाटील, मिलिंद नेमाडे, ललित झोपे, सुधाकर चौधरी, प्रकाश चौधरी, प्रकाश सावळे, सुनील ठोसर, दिपक महाजन ,विजय पाटील महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेत घेतले, हे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सुमारे एक महिन्याचे अथक परिश्रम या मुळे हे मूल्यमापन शिबिर उत्तम पद्धतीने संपन्न झाले.
Prev Post