सावखेडा परिसरात अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा, शेतकन्यांच्याकांचे लाखांच्या नुकसानीचा अंदाज

सावदा प्रतिनिधी ।

रावेर तालुक्यात सावदा, सावखेडा, खिरोदा, रोझोदा कुंभारखेडा, चिनावल लोहारा परिसरात २९ रोजी सुमारे ५:४५ वाजेच्या दरम्यान जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावून गारपिटीचा तडाखा दिला. गारपीट सुमारे २० ते २५ मिनिटे सुरूच होती. गार ही अंदाजे लिंबाच्या आकाराची होती. रस्त्यावर व शेतामध्ये सर्वदूर गारांचा खच पडलेला दिसून येत होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे या गारपिटीने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अचानक झालेल्या या गारपिटीने शेतकन्यांची खूपच तारांबळ उडाली. या गारपिटीने केळी पिकाला मोठा फटका बसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. रोझोदा येथे जोरदार वादळाने ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडलेली होती. लोहारा येथे या वादळी पावसामुळे सहा इलेक्ट्रिक पोल रस्त्यावर पडले व बीज तारा अक्षरश: रस्त्यावर पसरला गेल्या. लोहारा येथील काही घरांवरची पत्रेसुद्धा या वादळामुळे उडाली तसेच लोहारा येथील आदिवासी लोकांच्या झोपड्या सुद्धा वादळामुळे जमिनीनोधोस्त होऊन त्यांचेही संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाले. तसेच सावखेडा व लोहारा येथे रात्री उशिरापर्यंत वीज गुल झाली होती. अगोदरच अवकाळी पावसाने शेतकन्यांचे खूप नुकसान होत असून त्यात भर म्हणजे आज सायंकाळी गारपिटीने जोरदार वादळी पावसाचा व गारपिटीचा तडाखा दिला, त्यामुळे शेतकयांचे लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे तसेच इतर नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून त्वरित लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. सावदा येथे ही जोरदार पाऊस व काही प्रमाणात बारीक गारा देखील पडल्या जोरदार बन्या मुळे झाडे पडली अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे.